Advertisement

अटल सेतूवरून उडी घेत तरुण इंजिनिअरची आत्महत्या

काही महिन्यापूर्वी 43 वर्षीय डॉक्टर महिला किंजल शाह यांनी अटल सेतूवरून उडी घेत आपले जीवन संपवले होते.

अटल सेतूवरून उडी घेत तरुण इंजिनिअरची आत्महत्या
SHARES

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून उडी मारून जीव देण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. काही महिन्यापूर्वी 43 वर्षीय डॉक्टर महिला किंजल शाह यांनी अटल सेतूवरून उडी घेत आपले जीवन संपवले होते. त्यानंतर अशीच घटना पुन्हा घडली आहे. एका इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतूवरून खवळलेल्या समुद्रात उडी घेतल्याची घटना घडली आहे.

मंगळवारी (24 जुलै) दुपारच्या सुमारास घडली. श्रीनिवास कुरुकुट्टी (38) असे या बेपत्ता तरुणाचे नाव असून त्याचा समुद्रात सर्वत्र शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवास डोंबिवलीत रहात असून कुवैतमध्ये नोकरीला होते. वैफल्यातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

कारमधून उतरून समुद्रात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती रसत्यात कार थांबवून खाली उतरतो आणि कारचा दरवाजा बंद करून पुलाच्या कठड्यावरून खाली समुद्रात उडी मारतो.

श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. मात्र गेल्या ऑक्टोबरमध्ये ते जॉब सोडून डोंबिवलीतच आपला स्वतःचा व्यवसाय करत होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे ते तनावात होते.

मंगळवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ते चारचाकी गाडीतून अटलसेतुवर आले व सेतूवरुन थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेतली. ते बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. याआधी कुवैतमध्येही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

चार मच्छिमार बोटी, सागरी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांचा समुद्रात शोध घेतला जात आहे. मात्र खवळलेला समुद्र आणि पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, याआधी मार्च महिन्यात 43 वर्षीय डॉक्टर महिला किंजल शाह यांनी अटल सेतूवरून उडी घेत आपले जीवन संपवले होते. त्यानंतर अनेक दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही किंजल यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यांचीबॉडी अजून सापडली नाही.



हेही वाचा

सायन ब्रिजवरील वाहतूक जुलै 2026 पर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रस्त्यावर कचरा टाकताय? मग तुमच्यावर आहे सीसीटीव्हीची नजर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा