Advertisement

सावित्रीबाई फुले प्रसूती रुग्णालयात ३ दिवसांत ४ अर्भकांचा मृत्यू

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूती रुग्णालयात गेल्या ३ दिवसांत ४ अर्भकांचा मृत्यू झाला आहे.

सावित्रीबाई फुले प्रसूती रुग्णालयात ३ दिवसांत ४ अर्भकांचा मृत्यू
SHARES

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूती रुग्णालयात गेल्या ३ दिवसांत ४ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कथितपणे ही घटना सेप्टिक शॉकमुळे घडली असल्याची शक्यतां वर्तवली जात आहे. या प्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर सरकारनं या प्रकरणाशी संबंधि अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा केली.

आरोग्य विभागाचे मेडिकल अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या घटनेचे पडसाद गुरूवारी विधिमंडळात उमटले. 

मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहमध्ये एनआयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या ४ बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

सेफ्टीक इन्फेक्शनमुळं या मुलांचा मृत्यू झाला असल्याचा रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आलं होतं. आता रुग्णालयात आणखी ३ बाळ आहेत त्यांनाही असेच इन्फेक्शन झाल्याचे समोर आले आहे. 

''महानगरपालिकेमध्ये असा प्रकार होत असताना का लक्ष दिलं नाही? दिवसा ढवळ्या हा खून झाला आहे. तात्काळ कारवाई करा. आणखी किती बालकांचा मृत्यू होणार आहे, अशा शब्दात फडणवीसांनी संताप व्यक्त केला'', असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा