Advertisement

मुंबईत कोरोनाचे 441 नवे रुग्ण, तर दिवसभरात 21 जणांचा मृत्यू


मुंबईत कोरोनाचे 441 नवे रुग्ण, तर दिवसभरात 21 जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा धोका आता अधिक वाढला आहे. रविवारी महाराष्ट्रात  678 नवे रुग्ण आढळले असून त्यात मुंबई 441 नवे रुग्ण आढळले असून मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत एकूण 8613 रुग्ण आहेत. रविवारी मुंबईत 21 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 343 वर जाऊन पोहचला आहे.


मागील दिवसांमध्ये मुंबईत कोरोना मृत्यूदर खाली आला होता. मात्र, पुन्हा मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी  भर पडली आहे. राज्यभरात गेल्या 24तासांत कोरोनाचे 27 रुग्ण दगावले आहेत तर 30 एप्रिल रोजी सर्वाधित मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. 2 मे रोजी रोजी एकूण 27 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे 441 नवीन रुग्ण आढळले आहेत.

2 मे रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे काही अहवाल आले असून, त्यात 381 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशा एकूण 441नवीन रुग्णांची भर पडली आहे.  अशा रुग्णांची एकूण संख्या आता 11 हजार 464 इतकी झाली आहे. मुंबईत एकाच दिवसात करोनाचे 100 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 1 हजार 804 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा