Advertisement

मुंबईत ५ हजार ५०४ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे.

मुंबईत ५ हजार ५०४ नव्या रुग्णांची नोंद
SHARES

मुंबईत गुरूवारी कोरोनाचे ५ हजार ५०४ नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. मुंबईत गुरूवारी १४ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर एकूण २ हजार २८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या मुंबईत ३३ हजार ९६१ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत आज एकूण ४६ हजार ८६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ८० हजार ११५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत मुंबईत ३८ लाख ४१ हजार ३६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत मुंबईत ३ लाख ३३ हजार ६०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ६२० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे दर हा ८८ टक्के इतका आहे. तर १८ मार्च ते २४ मार्च पर्यंत मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.८९ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर ४५७ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र यावर्षीही कोरोनामुळे होळी साजरी करता येणार नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे यंदा होळी आणि रंगपंचमी त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दिलेल्या नियमांचे उल्लंधन केल्यास नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज ३५ हजार ९५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा