Advertisement

उमेदवार फुटण्याची भीती शिवसेना, भाजपालाही


उमेदवार फुटण्याची भीती शिवसेना, भाजपालाही
SHARES

मुंबई - मुबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारीपर्यंत आहे. पण आता केवळ तीन दिवस शिल्लक असताना शिवसेना आणि भाजपाने अजूनपर्यंत त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. एकीकडे शिवसेना आणि भाजपात इनकमिंग सुरू आहे. मात्र भाजपा आणि शिवसेनेला त्यांचे पदाधिकारी फुटून जाण्याची भीती असल्यामुळेच उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. परंतु, 31 जानेवारीचा दिवस संपला तरी शिवसेना, भाजपा आणि मनसेने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे आयत्यावेळी उमेदवार यादी जाहीर केल्यास 2 आणि 3 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि भाजपात सर्वच पक्षातील लोक येत असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करताना पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ते यादी जाहीर करणार नाहीत. दरम्यान काँग्रेस पक्षाने आपली 115 उमेदवारांची यादी जाहीर केली असून मनसे बुधवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत.

आतापर्यंत 61 उमेद्वारांनीच भरले अर्ज
उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी 31 जानेवारीपर्यंत केवळ 61 उमेदवारांनीच अर्ज महापालिका कार्यालयात दाखल केले. शहरात 11, पूर्व उपनगरात 24 आणि पश्चिम उपनगरात 26 आदी उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा