Advertisement

मुंबईत सीबीआयचे ६८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह


मुंबईत सीबीआयचे ६८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह
SHARES

सीबीआयच्या मुंबई कार्यालयात शनिवारी कोरोनाचा स्फोट झाला. शनिवारी ६८ कार्यालयीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सीबीआयचे कार्यालय मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. कार्यालयात काम करणाऱ्या २३५ लोकांना चाचणी करण्यास सांगितले होते. २३५ पैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. याआधी शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांच्या किमान ९३ कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले होते.

या प्रकरणांमुळे, मुंबई पोलीस विभागातील संक्रमितांची संख्या ९,६५७ वर पोहोचली आहे, ज्यामध्ये १२५ जवानांचा समावेश आहे. सध्या ४०९ बाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाग्रस्त २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. करोनाची बाधा झालेल्या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तसेच मोटर परिवहन विभागात कार्यरत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र भाटी यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १२५ वर पोहोचली आहे.

पोलीस खात्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा