
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे (CR) कडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (CSMT) – श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – हजूर साहिब नांदेड तसेच पनवेल–अमरावती दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत.
🔹 गाडी क्र. 01039
CSMT येथून २४.०१.२०२६ रोजी रात्री ००.३० वा. सुटेल आणि त्याच दिवशी ११.४५ वा. कोल्हापूर येथे पोहोचेल.
🔹 गाडी क्र. 01040
कोल्हापूर येथून २६.०१.२०२६ रोजी १६.४० वा. सुटेल आणि पुढील दिवशी सकाळी ०४.०५ वा. CSMT येथे पोहोचेल.
थांबे :
दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर व हातकणंगले.
डबे रचना :
१ एसी २-टियर, ३ एसी ३-टियर, ८ स्लीपर, ४ जनरल सेकंड क्लास व २ जनरल सेकंड क्लास-कम-गार्ड्स ब्रेक व्हॅन.
LTT – नांदेड – LTT विशेष (४ फेऱ्या)
🔹 गाडी क्र. 01041
LTT येथून २३.०१.२०२६ व २४.०१.२०२६ रोजी १५.३० वा. सुटेल आणि पुढील दिवशी ०४.०० वा. नांदेड येथे पोहोचेल.
🔹 गाडी क्र. 01042
नांदेड येथून २४.०१.२०२६ व २५.०१.२०२६ रोजी २३.३० वा. सुटेल आणि पुढील दिवशी १३.४० वा. LTT येथे पोहोचेल.
थांबे :
ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मंमद, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, पार्टूर, सेलू, परभणी व पूर्णा.
डबे रचना :
१ एसी २-टियर, ३ एसी ३-टियर, ८ स्लीपर, ४ जनरल सेकंड क्लास व २ जनरल सेकंड क्लास-कम-गार्ड्स ब्रेक व्हॅन.
अमरावती – पनवेल – अमरावती अनारक्षित विशेष (२ फेऱ्या)
🔹 गाडी क्र. 01415
पनवेल येथून २६.०१.२०२६ रोजी १९.५० वा. सुटेल आणि पुढील दिवशी १२.०० वा. अमरावती येथे पोहोचेल.
🔹 गाडी क्र. 01416
अमरावती येथून २२.०१.२०२६ रोजी १२.०० वा. सुटेल आणि पुढील दिवशी ०४.०० वा. पनवेल येथे पोहोचेल.
थांबे :
करजत, लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर व बदनेरा.
डबे रचना :
१६ स्लीपर क्लास / जनरल सेकंड क्लास / सेकंड क्लास चेअर कार आणि २ जनरल सेकंड क्लास-कम-गार्ड्स ब्रेक व्हॅन.
आरक्षण माहिती :
🔸 गाडी क्र. 01039, 01040 व 01041 साठी आरक्षण सर्व PRS केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर (www.irctc.co.in) उपलब्ध आहे.
🔸 अनारक्षित डब्यांसाठी सामान्य दराने तिकीट UTS अॅपद्वारे काढता येईल.
🔸 या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.
