Advertisement

मुंबईत सोमवारी ८०० जणांना कोरोनाची लागण

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती.

मुंबईत सोमवारी ८०० जणांना कोरोनाची लागण
SHARES

सोमवारी ८०० जणांना कोरोनाची बाधा झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती. शिवाय, कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळं पालिका यंत्रणा सतर्क झाली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

मागील आठवड्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यानं महापालिका अधिकारी चिंतित झाले होते. मात्र सोमवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली घसरली. नव्या ८०० रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७६ हजार ५०७ वर पोहोचली आहे. 

दरम्यान, विविध रुग्णालयांत उपचार घेणारे ३७२ रुग्ण सोमवारी कोरोनामुक्त झाले. मुंबईमधील कोरोनावाढीच्या दरात अल्पशी वाढ होऊन तो ०.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र रुग्ण कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर स्थिरावलं आहे, तर मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी २३३ दिवसांवर गडगडला आहे. १८ नोव्हेंबर रोजी रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी ३२० दिवसांवर पोहोचला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement