Advertisement

दिलासादायक! मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनानं वंचित असलेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून, रविवारी ५५४२ रुग्णांची नोंद झाली

दिलासादायक! मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनानं वंचित असलेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून, रविवारी ५५४२ रुग्णांची नोंद झाली. तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाणही घटू लागलं असून, ते  १३.७५ टक्के झाले आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत असून, ८६ टक्के  रुग्णा कोरोनामुक्त झालं आहेत.

मुंबईत रविवारी ५ हजार ५४२ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळं एकूण बाधितांची संख्या ६ लाख २७ हजार झाली आहे. एका दिवसात नव्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजे ८ हजार ४७८ रुग्ण बरे झाल्यामुळं आतापर्यंत ५ लाख ३७ हजाराहून अधिक म्हणजेच ८६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती; मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दर ७९ टक्यांपर्यंत कमी झाला होता. आता हा दर वाढून ८६ टक्के  झाला आहे.

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. ही संख्या ९२ हजारांपुढे गेली होती. ती आता ७५ हजार ७४० झाली आहे. त्यापैकी ७७ टक्के म्हणजेच ६२ हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर २२ टक्के  म्हणजेच १७ हजार रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १ हजार ४२१ झाली आहे.

रविवारी ६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यात ३६ पुरुष व २८ महिलांचा समावेश आहे. ४२ मृतांचं वय ६० वर्षांवरील होते. तर ३६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. १७ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. ५ मृतांचे वय ४० वर्षांखालील होते. मृतांची एकूण संख्या १२ हजार ७८३ झाली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर फेब्रुवारीनंतर रोज वाढत गेला असून, तो आता कमी होऊ लागला आहे. सध्या हा दर १.१७ टक्के आहे. तो दोन टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही ३४ दिवसांवरून ५८ दिवसांवर पोहोचला आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळं मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. दर दिवशी ४५ ते ५० हजार चाचण्या केल्या जातात. शनिवारी ४० हजार २९८ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सुमारे १४ टक्के  नागरिक बाधित आढळले. आतापर्यंत ५२ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा