Advertisement

पनवेल : खड्ड्यात पडून 24 वर्षीय तरुणीने गमावला जीव

चालकाने पीडितेला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.

पनवेल : खड्ड्यात पडून 24 वर्षीय तरुणीने गमावला जीव
Representational Image
SHARES

पळस्पे (palaspe) येथून जेएनपीटीकडे (JNPT) दुचाकीवरून जात असताना एका 24 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील नांदगाव (nandgaon) पुलावरून ही तरुणी तिच्या मित्रासह दुचाकीवरून जात असताना दुचाकीचे चाक एका मोठ्या खड्ड्यात (pothole) आदळले आणि दोघेही दुचाकीवरून खाली पडले. मागून येणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली येऊन 24 वर्षीय मानसी रोकडे हिचा मृत्यू झाला.

मुंबईतील (mumbai) घोपदेव येथील म्हाडा कॉलनीत राहणारी मानसी तिचा मित्र आदेश लाड याच्यासोबत माथेरानहून मुंबईला दुचाकीने घरी परतत असताना रविवारी हा अपघात झाला. पळस्पे ते जेएनपीटी रस्ता काँक्रीटचा असला तरी त्यातही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

नांदगाव पुलाजवळील खड्डय़ावर दुचाकीचे चाक गेल्याने दोघेही रस्त्याच्या उजव्या बाजूला फेकले गेले. याच दरम्यान आदेश यांच्या दुचाकीच्या पाठीमागून एक ट्रेलर (क्र. एमएच 43, यू. 1673) भरधाव वेगाने येत होता. मानसी ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

चालकाने पीडितेला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे वेळेत भरले असते तर मानसीचा जीव वाचला असता. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो.

पनवेल शहर पोलिसांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस ट्रेलर चालकाचा शोध घेत आहेत.



हेही वाचा

गर्लफ्रेंडची लोखंडी रॉडने हत्या, बॉयफ्रेंड अटकेत

ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर अपघात: दुचाकीस्वाराचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा