ईस्टर्न एक्स्प्रेस (eastern expressway) वेवर शुक्रवारी पहाटे एका ट्रकने उभ्या असलेल्या डंपरला धडक (accident) दिली. त्यानंतर दुचाकीस्वार ट्रकवर आदळला ज्यात दुचाकीस्वार वैभव डावखर (27) याचा मृत्यू (death) झाला. तसेच ट्रकमधील दोन जण जखमी झाले.
पहाटे तीनच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावरून डंपर भिवंडीच्या दिशेने निघाला होता. गोल्डन डायज येथील उड्डाणपुलाजवळ डंपर आला असता डंपरचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे डंपर चालकाने डंपर रस्त्यावर उभा केला. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने डंपरला धडक दिली.
दुचाकीस्वार (biker) वैभव डावखर हे बाळकुम येथील आपल्या घरी जात असताना ट्रकच्या पाठीमागून येत होते. ट्रकने डंपरला धडक दिल्याने वैभव डावखर यांची दुचाकी ट्रकवर आदळली आणि या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
ट्रकचा चालक धर्मेंद्र यादव आणि त्याचा सहकारी सुनील बाकरे हेही जखमी झाले आहेत. वैभवला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू (demise) झाला. धर्मेंद्र आणि सुनील यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा