राजावाडी रुग्णालयातून वयोवृद्ध पेशंट गायब

 Ghatkopar
राजावाडी रुग्णालयातून वयोवृद्ध पेशंट गायब
Ghatkopar, Mumbai  -  

श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेले देविदास किसन आंबोरे(65) घाटकोपर (पू.) येथील राजावाडी रुग्णालयातून गायब झाले आहेत. देविदास यांना रविवारी सायंकाळी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांचा एक हात आणि पाय निकामी झाला होता. कोणाच्याही आधाराशिवाय त्यांना उठताही येत नव्हते, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांना राजावाडी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 12 मध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी 24 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता देविदास यांच्या पत्नी तोंड धुण्यासाठी गेल्या. त्यानंतर जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांचे पती बेडवर नव्हते.

पती बेडवर नसल्याने त्यांनी वॉर्डमध्ये आणि रुग्णालयात शोधाशोध केल्यानंतरही देविदास कुठेही सापडले नसल्यामुळे आंबोरे कुटुंबियांनी तात्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. रुग्णालयातील व्यक्ती हरवलेली तक्रार रुग्णालयाने करणे अपेक्षित होते. पण, रुग्णालयाने ही तक्रार न करता देविदास यांची मुलगी गंगा सुरेश वानखेडे यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयात सुरक्षारक्षक असून देखील रुग्ण गायब झाल्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेबाबात प्रश्न चिन्हे उभे राहत आहे.

देविदास अगदीच चालू फिरू शकत नव्हते असे काही नाही. त्यांचा अर्धांगवायू माईल्ड स्वरुपाचा होता. त्यामुळे त्यांना चालता फिरता येत होते

- डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधिकारी, राजावाडी रुग्णालय

Loading Comments