Advertisement

ठाण्यात तरुण रेल्वेखाली, वाहतूक विस्कळीत


ठाण्यात तरुण रेल्वेखाली, वाहतूक विस्कळीत
SHARES

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्मवरून लोकलखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

 

कशी घडली घटना?

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात फलाट क्रमांक 4 वर सोमवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान एक प्रवासी गर्दीतून ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला आणि लोकलखाली आला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात नेणार तोच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिरा सुरू होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा