Advertisement

डोंबिवली : कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवासी पडला

रेल्वे प्रशासनाने या अपघाताची दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

डोंबिवली : कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवासी पडला
SHARES

डोंबिवलीजवळील (dombivli) कोपर (kopar) ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून पडून एक प्रवासी गंभीर जखमी (injured) झाला. सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून तो खाली पडला.   

कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात (accident) झाला. खाली पडलेल्या प्रवाशाच्या डोक्याला  मार लागला असून त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन तो बेशुद्ध पडला होता.

दिवा आणि कोपर ही दोन्ही रेल्वे स्थानके अपघातस्थळापासून लांब होती. त्यामुळे या प्रवाशांनी डोंबिवलीहून येणारी लोकल अडवली. जखमी प्रवाशाला पुढील उपचारासाठी दिवा येथील रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही.

कल्याणहून (kalyan) येणाऱ्या सुपरफास्ट लोकलच्या दरवाजाला लटकून हा प्रवासी प्रवास करत होता. डोंबिवली, कोपरनंतर लोकलने वेग पकडल्याने प्रवाशाचा तोल सुटून तो रेल्वे रुळावर पडला असावा, अशी शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कोपर ते मुंब्रा रेल्वे मार्गावर दर आठवड्याला दोन ते तीन प्रवाशांचा मृत्यू होत असल्याने रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी वेळोवेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्येक बैठकीत या भागातील अपघातांचा प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबत काही उपाययोजना करण्याची मागणी करत आहे.



हेही वाचा

ठाणे : रिंग मेट्रोच्या 22 स्थानकांसाठी निविदा काढण्यात येणार

महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहराच नाही?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा