
‘शाळा सोडल्याचा दाखला’ हा वयाचा निर्णायक पुरावा मानता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) एका प्रकरणात दिला आहे.
तसेच त्याच आधारे पोक्सोच्या (POCSO) गुन्ह्यातील आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 वर्षीय तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
तथापि, दोघांमध्ये प्रेमसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने हा निर्णय देत आरोपीला जामिनाचा दिलासा दिला.
आरोपी तरुण हा 25 वर्षांचा होता तर मुलगी 15 वर्षांची होती. त्यांचे प्रेमसंबंध होते. आरोपीने आपल्या बहिणीची ओळख करून देण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घरी नेले.
तसेच तेथे पीडित मुलीला फ्लॅटमध्ये डांबून ठेवले आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने या संदर्भात जबाब दिल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
तसेच त्यानंतर 10 ऑगस्ट 2022 रोजी आरोपी जयेश पारधी याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. त्याने अँड. अर्जुन कदम यांच्यामार्फत जामीनासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.
वसईतील (vasai road) वालीव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली.
हेही वाचा
