Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी कितपत तयारी? आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी कितपत तयारी? आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा
SHARES

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आपली कितपत तयारी आहे?, संभाव्य रुग्णसंख्येच्या तुलनेत बेड्स उपलब्ध आहेत का?, कोविड रुग्णालयांची सद्यस्थिती काय आहे?, या सर्वाचाच आढावा मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. 

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी तसंच महापालिका व जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी कोणत्याही आव्हानासाठी सज्ज राहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!- उद्धव ठाकरे

दिवाळीचा सण मागे पडला असताना व मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर मुंबईत परतत असताना आपल्याला आता अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. नव्याने विभागवार सर्वेक्षण करतानाच व्यापक तपासणी आणि जनजागृती यावर आपल्याला भर द्यावा लागेल, असं आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी यावेळी नमूद केलं. याशिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आपली कितपत तयारी आहे, संभाव्य रुग्णसंख्येच्या तुलनेत बेड्स उपलब्ध आहेत का, कोविड रुग्णालयांची सद्यस्थिती काय आहे, या सर्वाचाच आदित्य यांनी आढावा घेतला.

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी आधीच व्यक्त केली होती. दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या थंडीच्या काळात कोरोनाचा धोका वाढण्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या आरोग्य संचालकांना सर्वच कोरोना रुग्णालये, विलगीकरण केंद्रांना दक्ष राहण्याच्या, औषधोपचारांचा सर्व साठा तयार ठेवण्याच्या सूचना केलेल्या आहेत. कोरोना चाचण्या कमी न करण्याचा सल्लाही देण्यात आलेला आहे.

त्याशिवाय जनतेने देखील मास्क घालणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळणे, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा