Advertisement

दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे- उद्धव ठाकरे

गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे आहेत, त्यादृष्टीने सावधानता बाळगा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे- उद्धव ठाकरे
SHARES

कोरोना वाढीचा दर तसंच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे आहेत, त्यादृष्टीने सावधानता बाळगा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ काॅन्फरन्सिद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

लाॅकडाऊन (lockdown) शिथिल झाल्याने सुरुवातीला शहरात असलेला संसर्ग आता राज्यभर पसरलाय. आता ग्रामीण भागातसुद्धा रुग्ण सापडत आहेत.आपण आरोग्यविषयक खबरदारी घेतल्याने उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत. मात्र आता थंडी आली आहे. या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारही उफाळून येतात. विशेषत: ह्रदयविकार, न्यूमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. फ्ल्यू आणि कोरोनातील फरकही कळला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची किती शक्यता? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले...

सर्व काही खुले केल्याने विशेषत: शासकीय कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. ती कमी करणे, त्यासाठी काही कल्पक उपक्रम राबविणे गरजेचं आहे. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिल्या.

महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. त्यांची सातत्याने  चौकशी करा. त्यामुळे दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे. त्यामुळे काही उणीवा असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करा, वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सचा आढावा घ्या. कर्मचारी कमी करू नका. थोडी विश्रांती द्या पण तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील का हे पहा असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(be careful after diwali for not spreading coronavirus says maharashtra cm uddhav thackeray)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा