Advertisement

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची किती शक्यता? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले...

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही. तरीही राज्य सरकार सावधगिरी बाळगून सर्व त्या उपाययोजना करत आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची किती शक्यता? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले...
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट शक्यतो येणार नाही. तरीही राज्य सरकार सावधगिरी बाळगून सर्व त्या उपाययोजना करत आहे. सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणं आणि कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासोबतच फिव्हर सर्वेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण कक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते. (no chances of second wave of coronavirus in maharashtra says health minister rajesh tope)

यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही. मात्र संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्यात होणाऱ्या कोरोनाच्या चाचण्यामंध्ये खंड पडणार नसून ५०० लॅबच्या माध्यमातून अधिक चाचण्यांवर भर दिला जाणार आहे. 

हेही वाचा- यंदा फटाकेमुक्त दिवाळी‌? राज्य मंत्रिमंडळात मागणी करणार...

थंडीमध्ये इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचं समितीने सुचविले आहे. त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते अशा ‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रिय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत.

८० टक्के खाटा राखीव

राज्यात कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा कायम ठेऊन त्यात अजून वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णयही कायम राहील. लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयूमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना सिम्युलेशन लॅबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा