Advertisement

ई वाहनांसाठी महापालिका सज्ज; 'या' ठिकाणी चार्जिंगसाठी बॅटरी चार्जर युनिट बसवणार


ई वाहनांसाठी महापालिका सज्ज; 'या' ठिकाणी चार्जिंगसाठी बॅटरी चार्जर युनिट बसवणार
Image: Aaditya Thackeray Official Twitter
SHARES

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. त्यासाठी महापालिकेच्या शहर आणि उपनगरातील वरळी, घाटकोपर, सांताक्रूझ व अन्य ठिकाणच्या गॅरेजमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी बॅटरी चार्जर युनिट बसवण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या वाहन ताफ्यातील डिझेल, पेट्रोलची वाहने हळुहळू बंद करून त्याऐवजी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे. महापालिकेत येत्या काळात विजेवरील वाहनांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

२ महिन्यांपूर्वी दादर येथील कोहिनूर टॉवरमधील पालिकेच्या वाहनतळात मुंबईतील पहिले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. शहर विभागातील वरळी येथील रुग्णवाहिका गॅरेज, पूर्व उपनगरातील घाटकोपर पंतनगर गॅरेज, पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ गॅरेज व पालिका मुख्यालय अथवा मुंबईतील कोणत्याही योग्य ठिकाणी आवश्यक सुविधांसह सहा नग बॅटरी, चार्जर युनिटचा ३ वर्षे देखभालीसह पुरवठा करणारे युनिट सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मे. मॅक एन्व्हायर्नमेंट अँड सोल्युशन्स (इंडिया) प्रा. लि. या कंत्राटदाराला आवश्यक पायाभूत सुविधांसह युनिटची स्थापना करण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे.

या कामासाठी ७४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रमुख अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत विविध गॅरेजमध्ये ८५० वाहनांचा ताफा आहे. या वाहनांचा २४ तास वापर होतो. महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत पालिका अधिकारी, समित्यांचे अध्यक्ष यांना प्रशासनामार्फत वाहने उपलब्ध करून दिली जातात.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा