Advertisement

वरळीतील भूमिगत टाक्यांचं काम ‘इथपर्यंत’ आलं

पावसाचं अधिकचं पाणी साठवण्यासाठी परळ येथील झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी तयार होत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला.

वरळीतील भूमिगत टाक्यांचं काम ‘इथपर्यंत’ आलं
SHARES

पावसाचं अधिकचं पाणी साठवण्यासाठी परळ येथील झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी तयार होत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी घेतला. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मुंबईची भौगोलिक स्थिती आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे थोड्या कालावधीत होणारा प्रचंड पाऊस लक्षात घेता सखल भागात पाणी साचून समस्या निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून अधिक पावसाच्या वेळी दोन्ही टाक्यांमध्ये हिंदमाता परिसरात साचणारं पाणी पंपांच्या साहाय्याने आणून साठवलं जाणार आहे. यामुळे हिंदमाता परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने निर्माण होणारी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

कलापार्कच्या सुशोभीकरण व विकास कामासंदर्भात आराखड्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणदेखील करण्यात आलं.

यावेळी खासदार अरविंद सावंत, नगरसेवक विशाखा राऊत, प्रीती पाटणकर, उर्मिला पांचाळ, समाधान सरवणकर, महानगरपालिकेचे (bmc) अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त बल्लमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर, शरद उघडे आदी उपस्थित होते.

(aaditya thackeray review worli underground water storage tank)


हेही वाचा-

महापालिका 'यांच्या'साठी खरेदी करणार २४ नव्या गाड्या

ठाण्यातील काही भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा