Advertisement

ठाण्यातील काही भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

सॅटिस पुलाचे काम तसंच ठाणेकरवाडी येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं ठाणे महापालिकेने हाती घेतलं आहे.

ठाण्यातील काही भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद
SHARES

ठाणे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा मंगळवारी ६ जुलै रोजी बंद राहणार आहे. सॅटिस पुलाचे काम तसंच ठाणेकरवाडी येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं ठाणे महापालिकेने हाती घेतलं आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून २४ तास  शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा  होणार नाही.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या रामनगर, चेंदणी कोळीवाडा, नातू  परांजपे कॉलनी, सुभाषनगर, आनंद भारती मार्ग, कुंभारवाडा, सावरकरनगर, स्वामी समर्थ मठ परिसर, वाल्मीकी सोसायटी, श्रमदान सोसायटी, पत्रकार सोसायटी या भागांमधील पाणीपुरवठा २४ तास बंद असणार आहे. 

 मंगळवारी सकाळी ९ ते बुधवारी सकाळी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, असं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलं आहे. 



हेही वाचा-

विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

महापालिका 'यांच्या'साठी खरेदी करणार २४ नव्या गाड्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा