Advertisement

विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

लोकल प्रवासाची मुभा नसल्यानं सर्वसामान्यांचे होणारे हाल आणि रस्ते प्रवास करताना लागणारा अधिक वेळ यामुळे अनेकजण उपनगरीय लोकलनं विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आलं आहे.

विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ
SHARES

लोकल प्रवासाची मुभा नसल्यानं सर्वसामान्यांचे होणारे हाल आणि रस्ते प्रवास करताना लागणारा अधिक वेळ यामुळे अनेकजण उपनगरीय लोकलनं विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आलं आहे. मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर १ लाख २ हजार ३४२ प्रवाशांना, तर पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर २९ हजार ५५५ प्रवाशांना विनातिकीट पकडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नसल्यानं ते रेल्वे प्रवासाचा प्रयत्न करतात. त्यामुळे पकडण्यात येणाऱ्या या प्रवाशांची संख्या अधिक आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर तैनात नसलेले पोलीस ओळखपत्रे तपासून प्रवाशांना स्थानकात सोडत नाहीत. त्याचबरोबर काही स्थानकात तिकीट देतानाही ओळखपत्र तपासले जात नाही. तर काहीजण तिकीट दिले जाणार नाही, म्हणून विनातिकीच प्रवास करतात.

एप्रिल ते जून या ३ महिन्यात तब्बल १ लाख ३१ हजार ८९७ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तसंच, २ महिन्यांत ४ हजार ओळखपत्र रेल्वेने जप्त केली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर १४ एप्रिलपासून सर्वसामान्यांना पुन्हा लोकल प्रवासास बंदी घालण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर एप्रिल महिन्यात ८,२२८ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. मे महिन्यात ९,५९९ आणि जून महिन्यात हीच संख्या ११ हजार ७२८ पर्यंत गेली होती. मध्य रेल्वेवर तर विनातिकीट सापडणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक  आहे. एप्रिलमध्ये २८ हजार ९१० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. मेमध्ये ३२,९०७ आणि जूनमध्ये हीच संख्या ४० हजार ५२५ होती.

उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी अत्यावश्यक सेवांचे बनावट ओळखपत्र तयार करून लोकल प्रवास के ला जात आहे. मध्य रेल्वेवर एप्रिल ते जुलैपर्यंत ३ हजार ३०० बनावट ओळखपत्रे आणि पश्चिम रेल्वेवर ७४० बनावट ओळखपत्रे जप्त  करण्यात आली. बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्यांवर जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा