Advertisement

गोरेगावचा आरे रोड तात्पुरता बंद, 'हा' आहे पर्यायी मार्ग

आरेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण माहिती...

गोरेगावचा आरे रोड तात्पुरता बंद, 'हा' आहे पर्यायी मार्ग
(Representational Image)
SHARES

सोमवार 25 जुलै रोजी दुपारी 12 ते रात्री 12 या वेळेत आरे रोड तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. पालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सुरू असलेल्या कामामुळे हा रस्ता काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. रविवार 24 जुलै रोजी, मुंबई वाहतूक पोलिसांनी एक प्रेस स्टेटमेंट जारी करत ही माहिती दिली.

दिंडोशी वाहतूक विभागातील आरे कॉलनीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

MMRC आणि MCGM द्वारे चालू असलेल्या कामामुळे आरे रोड आज दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी तात्पुरता प्रतिबंधित करण्यात आला आहे.

पवई/मरोळला जाण्यासाठी कृपया JVLR चा वापर करावा असे ट्विट वाहतुक पोलिसांनी केले आहे.

आरे कॉलनीतील रहिवाशांना आरे रोड वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे, वाहनचालक आणि जनता पवई किंवा मरोळला जाण्यासाठी JVLR रस्त्याचा वापर करू शकतात. नागरिकांनी वरील बदलांची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एमएमआरसी आणि एमसीजीएमने सोमवारी आरे कॉलनीत अनेक कामे केल्याने, दिंडोशी वाहतूक विभागातील आरे कॉलनी ते मरोळ नाका आणि आरे कॉलनी ते फिल्टरपाडा या रस्त्यांवरील वाहतूक सोमवारी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत वळवावी लागली.



हेही वाचा

चिंता वाढली, मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा