Advertisement

'आरे'तल्या पाड्यांचं पुनर्वसनासाठी सर्वेक्षण


'आरे'तल्या पाड्यांचं पुनर्वसनासाठी सर्वेक्षण
SHARES

गोरेगाव - आरे कॉलनीतल्या आदिवासी पाड्यांतल्या रहिवाशांचं पुनर्वसन आणि सोयी-सुविधा यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. गोरेगाव पूर्वेच्या आरे परिसरातल्या आदिवासी पाड्यांतल्या जनतेचं पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हरित लवादाकडून परवानगी घेण्यात यावी, तसंच फोर्स वन येथील तीन आदिवासी पाड्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करावं, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना दिले.
आरेतील २७ आदिवासी पाड्यांना गावठाणांचा दर्जा देऊन त्यांचं एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्याची सूचना मुख्य सचिवांना केली. मानवतेच्या दृष्टीकोनातून आदिवासींना मूलभूत सुविधा दिल्याच पाहिजे, असं मतही मुख्य सचिवांनी व्यक्त केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा