Advertisement

बोरिवली स्टेशनजवळील १ हजार ८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

हापालिकेच्या आर मध्य विभागातील बोरिवली स्टेशनजवळील पूर्व व पश्चिम बाजूकडील मागाठाणे, दत्तपाडा, सुदाम नगर, काजूपाडा, गोराई, चारकोप, बोरसापाडा या परिसरात कारवाई करण्यात अाली. याच विभागाच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्टेशनजवळच्या परिसरात फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना व वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.

बोरिवली स्टेशनजवळील १ हजार ८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई
SHARES

गेल्या काही दिवसांपासून बोरिवली रेल्वे स्टेशनच्या पूर्व व पश्चिमेकडील रस्त्यांवर असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस व पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा येत होता. त्यामुळे पालिकेच्या आर मध्य विभागातर्फे २७ नोव्हेंबरपासून धडक कारवाई सुरू करण्यात आली अाहे.

 अातापर्यंत १ हजार ८८५ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात अनधिकृत भाजी विक्रेते, फळ विक्रेते, कपडे, कटलरी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांचा प्रामुख्यानं समावेश आहे.  या कारवाईमुळे बोरिवली स्टेशन परिसरातील रस्ते व पदपथ मोकळे झाले आहेत. 


वाहतुकीस अडथळा

 महापालिकेच्या आर मध्य विभागातील बोरिवली स्टेशनजवळील पूर्व व पश्चिम बाजूकडील मागाठाणे, दत्तपाडा, सुदाम नगर, काजूपाडा, गोराई, चारकोप, बोरसापाडा या परिसरात कारवाई करण्यात अाली. याच विभागाच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्टेशनजवळच्या परिसरात फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना  व वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. 


साहित्य जप्त

 पालिकेच्या धडक कारवाईमुळं हा रस्ता मोकळा करण्यात आला अाहे. यावेळी १ हजार ८८५ अनधिकृत फेरीवाल्यांकडील साहित्य जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये ६८५ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचादेखील समावेश असून या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील ३२ गॅस सिलिंडर, १०२ स्टोव्ह व शेगड्या जप्त करण्यात आल्याची माहिती विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.



हेही वाचा - 

५९० भूखंडाच्या 'प्रॉपर्टी कार्ड'वर महापालिकेचे नावं

बेस्ट उपक्रमात दाखल होणार ८० इलेक्ट्रिकल मिडी बस





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा