Advertisement

५९० भूखंडाच्या 'प्रॉपर्टी कार्ड'वर महापालिकेचे नावं


५९० भूखंडाच्या 'प्रॉपर्टी कार्ड'वर महापालिकेचे नावं
SHARES

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ४ हजार ७८८ भूखंडांपैकी २ हजार ३७७ मालमत्तांबाबत महापालिकेकडे कायदेशीर दस्तावेज आहेत. परंतू, मालमत्ता पत्रकांवर पालिकेचं नाव नव्हतं. भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २०१७ मध्ये आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश महापालिकेत्या मालमत्ता खात्याला दिले होते. त्यानुसार गेल्या काही दिवसांत ५९० मालमत्तांच्या प्रॉपर्टी कार्डवर महापालिकेचे नावं लावण्यात आलं आहे. तसंच, उर्वरीत १ हजार ७८७ मालमत्ता प्रॉपर्टी कार्डबाबत भूमापन व भूमी अभिलेख खात्यांच्या सहकार्याने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. 


कार्यवाही प्रलंबित

१८९८ साली बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्ट (BIT) स्थापन झाल्यानंतर तत्कालीन नियमांनुसार अनेक भूखंड ट्रस्टकडे हस्तांतरीत झाले होते. हे भूखंड भाडे तत्वावरील निवासी बांधकामांसाठी उपयोगात आणले गेले होते. त्यावेळी या मालमत्तांच्या प्रॉपर्टी कार्डवर बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे नाव लावण्यात आले होते. परंतू, १९२५ साली  बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्ट महापालिकेत विलीन झाली. मात्र, तरीही भूखंडाच्या प्रॉपर्टी कार्डवर बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्टचं नाव होतं. त्यावेळी विकास नियोजन आरक्षणांतर्गत महापालिकेने खरेदी केलेले भूखंड किंवा मालमत्ताकर न भरल्यामुळे पालिकेच्या ताब्यात अलेल्या मालमत्ता आणि भूखंड महापालिकेचे झाले होते. परंतू, यापैकी काही मालमत्तांच्या आणि भूखंडांच्या प्रॉपर्टी कार्डवर महापालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही प्रलंबित होती.


पालिकेचे नाव बंधनकारक

आयुक्तांच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात मुंबई महापालिकेच्या मालमत्ता खात्याच्या ताब्यात असलेल्या ४ हजार ७८८ भूखंडांपैकी २ हजार ४११ भूखंडांच्या प्रॉपर्टी कार्डवर महापालिकेचे नाव अंतर्भूत आहे. परंतू, उर्वरित २ हजार ३७७ भूखंडाच्या प्रॉपर्टी कार्डवर पालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. तसंच, महापालिकेनं ६० वर्षे, ९९ वर्षे, ९९९ वर्षे किंवा शाश्वत मक्त्याने दिलेल्या भुभागावर पुर्नवसन प्रकल्प करतेवेळी प्रॉपर्टी कार्डवर महापालिकेचे नाव मक्तेदार म्हणून अंतर्भूत करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक आयूक्त मसूरकर यांनी दिली आहे.



हेही वाचा -

बेस्ट उपक्रमात दाखल होणार ८० इलेक्ट्रिकल मिडी बस




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा