मस्जिद बंदर - येथील स्टेशन रेल्वे पूल, काझी सय्यद स्ट्रीट परिसराची बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदय शिरुरकर यांनी पाहणी केली. याशिवाय सँडहर्स्ट रोड, मैशरी रोड, भातबाजार, कोळीवाडा, एल टी मार्ग, मोहम्मद अली रोड आणि जे जे हास्पिटल या भागांचेही निरीक्षण केले. त्यामुळे या परिसरातल्या फेरीवाल्यांची एकच तारांबळ उडाली.
निरीक्षण केले म्हणजे कधीही कारवाई होऊ शकते, अशी भीती फेरीवाल्यांनी व्यक्त केली. पण आमच्यावरच कारवाई का होते? असा प्रश्न फेरीवाल्यांनी उपस्थित केला. पण सरकारी कामापुढे कोणाला ही झुकते माप मिळणार नाही या तत्वाखाली शिरुरकर यांच्या कारवाईला कोणी विरोध करत नाही. या कारवाईमुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडचण होत नाहीये. त्यामुळे स्थानिक सध्या समाधानी आहेत.