देवनारच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही

  Pali Hill
  देवनारच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही
  मुंबई  -  

  मुंबई - पालिकेच्या देवनार डम्पिंग ग्राऊंडचा 110 हेक्टरचा परिसर असून, या मोठ्या भूखंडास कुठेही तारेचे कुंपण किंवा कंपाऊंड वॉल नाही. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वारंवार लागणाऱ्या आगी तसेच कचरा वेचकांचा उपद्रव लक्षात घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन यांचे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याठिकाणी देखरेखीसाठी भाडेतत्वावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव आणण्यात आलाय.

  देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वारंवार लागणाऱ्या संशयास्पद आगी, कचरा वेचकांचा उपद्रव. वारंवार सुरक्षा खात्यातील आणि घनकचरा खात्यातील कर्मचाऱ्यांवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारे हल्ले या सारख्या बाबींवर सुरक्षा खात्यातील कर्मचाऱ्यांकडून नियंत्रण करण्याचा प्रयत्न होतो. सद्यपरिस्थितीत देवनार क्षेपणभूमी येथे मे. ईगल सिक्युरिटी अण्ड पर्सनल सर्व्हिसेस यांच्याकडून खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलीय. मात्र ही सुरक्षायंत्रणा पुरेशी नसून, वारंवार लागणाऱ्या संशयास्पद आगीमुळे हा परिसर संवेदनशील झालाय. तसेच आगीमुळे मुंबईचे पर्यावरण अत्यंत प्रदूषित होत असल्यानं या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था उभारणं क्रमप्राप्त होतंय. यासाठी महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशन आणि पालिका अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तपासणी करून सुरक्षा व्यवस्था करण्याकरिता प्रस्ताव सादर केलाय. दरम्यान, देवनार डम्पिंग ग्राऊंडवर 24 तास कामकाज सुरु असल्यानं परिरक्षण, उपाययोजना आणि सुरक्षेच्या दृष्टीनं उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलीय. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 यांची नियुक्ती करण्यात आलीय. या ठिकाणी लागणाऱ्या सततच्या आगीच्या अनुषंगाने उच्च न्यायालयानं देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे आदेश दिलेले असल्यानं दोन वर्षे कालावधीसाठी सौर उर्जावर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि संलग्न प्रणालीची सेवा दोन वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.