Advertisement

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी, कॅगकडून १० हजार पदांसाठी जाहिरात

कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच कॅग संस्था तब्बल १० हजार जागा भरणार आहे. कॅगने या जागांसाठी भरती प्रक्रियाही सुरू केली आहे.

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी, कॅगकडून १० हजार पदांसाठी जाहिरात
SHARES

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या सध्या मोठी आहे. अशा बेरोजगारांना आता नोकरीची सुवर्ण संधी मिळाली आहे. तसंच सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. 

कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच कॅग संस्था तब्बल १० हजार जागा भरणार आहे. कॅगने या जागांसाठी भरती प्रक्रियाही सुरू केली आहे. या भरतीत ऑडिटर, अकाऊंटंट आणि इतर पदं असणार आहेत. १९ फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

 कॅगने २०२१ या नव्या वर्षात १० हजार ८११ पदांसाठी पदांसाठी भरती जाहीर केली आहे.  कॅगच्या अधिकृत वेबसाईट cag.gov.in वर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरतीत ऑडिटर आणि अकांऊटंटची अधिक पदं आहेत. 



हेही वाचा -

खासगी रुग्णालयांना महापालिका लसीकरण केंद्रे घोषित करण्याची शक्यता

प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा