Advertisement

आता खासगी रुग्णालयांतही कोरोना लसीकरण केंद्र

खासगी रुग्णालयांनाही लसीकरण केंद्र बनवण्याची मागणी केली गेली आहे.

आता खासगी रुग्णालयांतही कोरोना लसीकरण केंद्र
SHARES

खासगी रुग्णालयांनाही लसीकरण केंद्र बनवण्याची मागणी केली गेली आहे. त्यानंतर, महापालिका आता खासगी रुग्णालयांना देखील फ्रंटलाईन वर्कर्स आणि वृद्धांच्या लसीकरणासाठी केंद्रे म्हणून घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेनं मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयांमधून रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची यादी मागितली आहे. 

मुंबईत सध्या लसीकरणाची १० केंद्रे आहेत. त्यापैकी ९ महापालिका रुग्णालयं आणि एका शासकीय रुग्णालयाचा समावेश आहे. मागील आठवड्यात मुंबई ट्रस्ट आणि खासगी रुग्णालयांच्या असोसिएशनच्या वतीनं अशी मागणी केली गेली होती की, काही खासगी रुग्णालये देखील लसीकरण केंद्र बनवली जावीत जेणेकरून तेथे कार्यरत आरोग्य सेवा कामगारांना रुग्णालयातच लसीकरण करता येईल. अशा परिस्थितीत पालिकेने कोविन अ‍ॅपवर नोंदणीकृत कर्मचार्‍यांचा तपशील मोठ्या खासगी रुग्णालयांकडून मागितला आहे.

खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र बनवण्याच्या मागणीवर विचार केला जात आहे. त्यांना दुसरा टप्पा अर्थात फ्रंटलाइन वर्कर्स आणि तिसरा टप्पा म्हणजे वृद्धांना लसी देण्याची परवानगी देण्यावर विचार विनिमय सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईतील ५० टक्के आरोग्य कर्मचारी खासगी रुग्णालयात काम करतात. काही खासगी रुग्णालयात (प्रत्येकी) सुमारे २ हजार आरोग्य सेवा कर्मचारी आहेत. कर्मचार्‍यांची एकमेव अडचण म्हणजे त्यांना लस टोचण्यासाठी लांबचा पल्ला गाठवा लागतो. जर त्यांना त्यांच्या स्वत: च्या रुग्णालयात ही लस मिळाली तर ते खूप चांगले होईल.

सोमवारी मुंबईतील १० लसीकरण केंद्रांवर लसीकरण युनिट्सची संख्या ३२ वरून ६५ करण्यात आली आहे. यासह, लाभार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. मात्र, केवळ ७७ टक्के आरोग्य कर्मचारी लसी केंद्रांवर पोहोचले. सोमवारी ६५०० जणांना लस देण्याचं ठरवलं होतं. मात्र, केवळ ५००५ लाभार्थ्यांनी ही लस घेतली.

लसीकरण

केंद्र
२५ जानेवारी
एकूण
केईएम
७८७
३११७
बीडीबीए
८६०
२९८५
राजावाडी
६७९
२६७२
नायर
५७८
२००१
कूपर
५६२
२३१५
बीकेसी जंम्बो
५०८
१७८८
सायन
४५९
१५१७
वांद्रे भाभा
४४७
१४४४
व्हीएन देसाई
५५
४०८
जेजे
३४
१४५
एकूण
५००५
१८२०२
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा