Advertisement

खाद्यतेल तब्बल 'इतक्या' रुपयांनी महागले

भारतात गेल्या २ महिन्यांपासून इंधन दरवाढाबरोबरच, घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

खाद्यतेल तब्बल 'इतक्या' रुपयांनी महागले
SHARES

भारतात गेल्या २ महिन्यांपासून इंधन दरवाढाबरोबरच, घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा मालाच्या तुटवड्यामुळे खाद्यातेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. देशात गेल्यावर्षी १ एप्रिलच्यातुलनेत १५ किलो खाद्यतेलाच्या डब्ब्याची किंमत १ हजार रुपयांनी महागले आहे. तसेच शेंगदाण्याचे तेल, पाम तेल, सोयाबीनचे तेल या सगळ्याच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता खाद्यतेल किंमत वाढीचाही आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेले कच्च्या तेलाची तुटवडा, आयातीवरील वाढलेले खर्च आणि इंधन दरवाढीच्या फटका खाद्यतेलाच्या किंमतींवर बसला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंममध्ये तब्बल २५ टक्क्यांनी वाढल्या आहे. या किंमती २०० रुपये किलोपर्यंत वाढू शकतात. या महिन्याखेरीज खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींना आता गॅस सिलेंडर, भाजीपाला किंमतींच्या वाढीबरोबरच आता खाद्यतेल किंमत वाढीचाही फटका सहन करावा लागणार आहे.

नोव्हेंबर २०२० सुर्यफूल तेलाचे १ किलोचा दर १०० रुपये होता. यात मार्च २०२१ मध्ये ६० रुपयांची वाढ होत १ किलो सुर्यफूल तेलासाठी ग्राहकांना १६० रुपये मोजावे लागत आहेत. तर सोयाबीन तेलाच्या किंमती ९० ते ९२ रुपये होत्या. यात आता ४० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तेलासाठी ग्राहकांना १ किलोसाठी १३० रुपये मोजावे लागणार आहेत. भारत ८० टक्के खाद्यतेल इंडोनेशिया, मलेशिया, युक्रेन, ब्राझील, अजेंटिना या देशांमधून आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने तेलाच्या किंमती महागल्या आहेत. तसेच यंदा पिकांच्या नुकसानीत वाढ झाल्याने खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सुर्यफूल आणि सोयाबीनच्या किंमतींतही वाढ झाली आहे. विदेशातही खाद्यतेल उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे निर्यातदार मलेशिया आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांनी निर्यात शुल्कात ३० टक्के वाढ केली आहे. मात्र भारताने आयात शुल्कात १० टक्के केली मात्र याच फारसा परिणाम भाववाढीवर होताना दिसत नाही.



हेही वाचा -

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा