लोहारचाळ परिसरात ४ मजली इमारत कोसळली

मुंबईतील लोहारचाळ परिसरात ४ मजली इमारत कोसळली आहे.

SHARE

मुंबईतील लोहारचाळ परिसरात ४ मजली इमारत कोसळली आहे. शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास इमारत कोसळली आहे, मात्र, या घटनेतील जखमींची नाव अद्याप अस्पष्ट असून, काही जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडलेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

४ मजली इमारत

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या लोकमान्य टिळक रोडवरील अहमद या ४ मजली इमारतीचा भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

धोकादायक इमारत

कोसळलेल्या इमारतीचा मलबा हटविण्याचं काम सध्या सुरू असून घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहेधोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचं नाव होतं. काही दिवसांपूर्वी इमारतीतील रहिवाशांना तेथून हलवण्यात आलं होतं. यामुळे सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान इमारतीच्या खाली असणाऱ्या काही दुकांनांचं मात्र खूप नुकसान झालं आहे.हेही वाचा -

डेक्कन क्वीनच्या ‘डायनिंग कार’ला मिळणार नवा साजसंबंधित विषय
ताज्या बातम्या