Advertisement

शिवाजी पार्क धूळमुक्त करण्यासाठी एएलएम प्रयत्नशील


शिवाजी पार्क धूळमुक्त करण्यासाठी एएलएम प्रयत्नशील
SHARES

आपला परिसर स्वच्छ आणि हरित राहावा यासाठी 2015 साली पालिकेच्या मदतीने शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम)ची स्थापना केली. या परिसरात एकूण 22 इमारती आहेत. त्यामध्ये जवळपास 450 घरे आहेत. शिवाजी पार्कात जवळपास 27 एकर एवढे खुले मैदान आहे. या मैदानात प्रचंड धूळ उडत असते. त्याचा त्रास होत असल्याची तक्रार इथल्या स्थानिकांनी केली आहे. मात्र याचे निवारण करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ, हरित कसा ठेवता येईल याबाबत एएलएमच्या सदस्यांनी नगरसेविका विशाखा राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली.

पालिकेकडून 40 लाख खर्च करून फक्त 14 टक्के मैदानावरच पाण्याची फवारणी केली जात असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. पण उर्वरित मैदानावर पाण्याची फवारणी होत नसल्यामुळे शिवाजी पार्क परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ज्यामुळे अनेक स्थानिकांना त्रास होत असल्याची तक्रार एएलएमचे सदस्य लिनेश धुलेशचार यांनी दिली.

या संदर्भात पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी माहिती दिली आहे, की पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. या व्यतिरिक्त शिवाजी पार्कच्या आतील भागातही स्वच्छता रहावी याकरता पालिकेकडूम सफाई कर्मचाऱ्याचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. या परिसरात डासांचेही मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे. त्यावर वेळच्या वेळी फॉगिंग करुन उपाय योजने, तसेच पार्किंगच्या समस्येवर चर्चेतून तोडगा काढणे हे विषय आपण प्रशासन दरबारी मांडणार आहोत. 

- विशाखा राऊत, नगरसेविका, शिवसेना

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा