Advertisement

पिकनिकला जाताय? आंबेनळी घाट वाहतुकीस 'इतके' दिवस बंद

कोकण व महाबळेश्वरला जाण्यासाठीचा पर्यायी रस्ता कोणता? जाणून घ्या

पिकनिकला जाताय? आंबेनळी घाट वाहतुकीस 'इतके' दिवस बंद
SHARES

कोकणात रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आजपासून पुढील 15 दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

कोकण व महाबळेश्वरला जोडणारा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा आंबेनळी घाट आहे.

अपर पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग यांच्या पत्रानुसार आंबेनळी घाट रस्ता हा अरूंद व घाट वळणाचा असल्याने रस्त्याचे बाजूला असणारा डोंगरकडा हा या भागात पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन होवून डोंगरावरील माती व मोठमोठे दगड रस्त्यावर आल्याने तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाट रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

रस्त्यावरून वाहतुक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवून मोठया प्रमाणांत जिवित व वित्तीय हानी होण्याची दाट शक्यता आहे.

या कारणास्तव हा रस्ता बंद करण्यात येऊन, पर्यायी रस्ता पोलादपूर खेड-चिपळूण-पाटण- कराड-कोल्हापूर तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा पर्यायी मार्ग आहेत, असे अभिप्राय सादर केले आहेत.

पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता हा सद्य:स्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीकरीता पूर्ण बंद करणेबाबत तसेच त्याबाबत दर १५ दिवसांनी आढावा घेवून घाट रस्ता बंद ठेवण्याबाबत निर्णय घेणे योग्य राहील अशी विनंती केली होती.

त्यानुषंगाने या कार्यालया कडील दि.२८/०७/२०२३ रोजीच्या अधिसुचनेनुसार पुढील १५ दिवसांकरीता पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्यात आलेला आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा