
शिलाहारकालीन हे प्राचीन मंदिर दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते. मंदिराचा ऐतिहासिक आणि वारसास्थळाचा दर्जा कायम ठेवत भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचे सुशोभीकरण, रुंद पादचारी मार्ग, सार्वजनिक सुविधा, माहिती केंद्र, सांस्कृतिक जागा, पार्किंग, हिरवळ तसेच पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन यांसारखी कामे प्रस्तावित आहेत.
हे मंदिर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) अखत्यारित असल्याने पुनर्विकासाची सर्व कामे वारसा संवर्धनाच्या नियमांनुसार आणि ASIच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जाणार आहेत.
अंबरनाथ नगरपरिषदेने आता या प्रकल्पासाठी Project Management Consultant (PMC) नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्पर्धात्मक निविदेद्वारे नियुक्त होणारा सल्लागार प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल, संकल्प आराखडा, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), वास्तुशास्त्रीय व अभियांत्रिकी आराखडे, खर्चाचे अंदाजपत्रक तसेच तांत्रिक आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प पुढे नेला जात आहे. या पुनर्विकासामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच अंबरनाथ शहराची स्वतंत्र ऐतिहासिक आणि धार्मिक ओळख अधिक ठळक होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा
