Advertisement

'त्या' जखमी फ्लेमिंगोला अखेर मिळाले जीवदान!


SHARES

वसईच्या समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी जखमी अवस्थेत एक फ्लेमिंगो पक्षी सापडला. या पक्ष्यांची जात विशेषत: दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळते. जखमी अवस्थेतील या फ्लेमिंगोवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. मात्र, स्थानिकांनी त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून खासगी स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिले. या फ्लेमिंगोवर मुंबईच्या पशू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुजरातच्या कच्छ परिसरात आढळणारे हे पक्षी जून महिन्यात दिसतात. 

हे पक्षी जिथे जातात तिकडे यांचा थवा असतो. मात्र हा फ्लेमिंगो जखमी असल्याने तो पुन्हा जाऊ शकला नसल्याचे स्वंयसेवी संस्थेचे अध्यक्ष सचिन मेन यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा