Advertisement

डोंबिवलीतील 'या' स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विकासाला 180 कोटींची मंजुरी

हा कॉम्प्लेक्स ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देत क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरू शकतो.

डोंबिवलीतील 'या' स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विकासाला 180 कोटींची मंजुरी
SHARES

डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विकासकामाला आता सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी 180 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

अनेक क्रीडा सुविधा केंद्रांची उभारणी

गेल्या काही वर्षांत सांसद डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या शहरांत अनेक क्रीडा सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, आता डोंबिवलीतील या जुन्या क्रीडासंकुलाचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी 25 हजार चौ. मीटर क्षेत्रामध्ये मोठी बहुमजली इमारत उभारली जाणार आहेत. विविध खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

१६ हजार चौ. मीटर पार्किंगची सोय

पहिल्या टप्प्यात

  • इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

  • ऑलिम्पिक दर्जाचा मोठा स्विमिंग पूल

  • डायविंग पूल

  • 16 हजार चौ. मीटर पार्किंग क्षेत्र

यांचा विकास केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आधुनिक स्टेडियम उभारले जाईल. या संकुलामुळे ठाणे जिल्ह्यातील हजारो खेळाडूंना एकाच ठिकाणी आधुनिक सुविधा मिळणार असून, क्रीडा प्रतिभांना मोठा प्रोत्साहन मिळेल.

खेळाडूंसाठी निवासाची सुविधाही उपलब्ध

नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खालील क्रीडा व पूरक सुविधा असतील:

  • योगा आणि जिम्नॅजियम

  • बॅडमिंटन

  • टेबल टेनिस

  • कराटे, मार्शल आर्ट्स, जूडो

  • स्क्वॅश व स्नूकर

  • शूटिंग रेंज

  • जिम्नॅस्टिक

  • आधुनिक फिजिओथेरपी सेंटर

  • बँक्वेट हॉल

  • खेळाडूंसाठी राहण्याची सुविधा

महापालिका करणार देखभाल

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विकासाचा प्रस्ताव सांसद डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे सादर केला होता. हा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केला. हा प्रकल्प MIDC च्या निधीतून पूर्ण करण्यात येणार आहे. नंतर त्याची देखभाल कल्याण-डोंबिवली महापालिका करणार आहे.


हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! 30 तास पाणीपुरवठा बंद

वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी GRAP-4 लागू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा