Advertisement

अंधेरी-घाटकोपर जंक्शन येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

या उड्डाणपुलाची दक्षिण बाजू खुली झाल्यानं वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

अंधेरी-घाटकोपर जंक्शन येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
SHARES

पूर्व द्रुतगती मार्गावरील अंधेरी-घाटकोपर (andheri-ghatkoper) जंक्शन येथील मुंबईकडं जाणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. उड्डाणपुलाचा खर्च ३३.०४ कोटी रुपये असून, रुंदी १२ मीटर आणि लांबी ६९३ मीटर आहे. या उड्डाणपुलाची दक्षिण बाजू खुली झाल्यानं वाहतूक कोंडी (traffic jam) काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती मार्गानं मुंबईहून ठाण्याकडं जाणाऱ्या प्रवाशांसाठी अंधेरी-घाटकोपर जंक्शन इथं ३ मार्गिकांचा एकदिशा उड्डाणपूल आहे. मात्र मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा नसल्यानं या उड्डाणपुलाजवळ कायमच वाहतूक (mumbai traffic) कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यासाठी मुंबईच्या दिशेनं ३ मार्गिकांच्या उड्डाणपुलाचं काम मे २०१८ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. अडीच वर्षांनंतर हे रखडलेलं काम पूर्ण होऊन अखेरीस हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाला.

नवीन उड्डाणपुलामुळं ही वाहतूक विभागली जाणार असून, जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. लॉकडाऊन शिथिलीकरणात अद्याप उपनगरी रेल्वेचा प्रवास सर्वासाठी खुला झाला नसल्यानं मागील ४ महिन्यांपासून रस्त्यावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंडनंतर विक्रोळीपर्यंतचा प्रवास अत्यंत वेगात होतो. मात्र अंधेरी-घाटकोपर जंक्शन इथं उड्डापुलाच्या कामामुळं मुख्य रस्त्यावरील केवळ एकच मार्गिका वापरता येत होती.

मागील ४ महिन्यांत या ठिकाणी सातत्यानं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. घाटकोपर येथील उड्डाणपुलामुळं येथील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच वेळी उड्डापुलावरून मुंबईच्या दिशेनं जाताना रमाबाई नगर इथं मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम सुरू असल्यानं पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा