Advertisement

गोरेगावच्या बाजीप्रभू ढोल-ताशा पथकातील आणखी एका तरुणाचा मृत्यू

खोपोलीजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा १४ वर गेला आहे.

गोरेगावच्या बाजीप्रभू ढोल-ताशा पथकातील आणखी एका तरुणाचा मृत्यू
SHARES

खोपोलीजवळील अपघातातील आणखी एकाचा जखमीचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव पश्चिमेकडे राहणारे संकेत चौधरी यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली.

खोपोलीजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर जवळपास १८ जणांना गंभीर अवस्थेत नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. या १८ गंभीर जखमींमध्येच गोरेगावच्या संकेत चौधरी यांचा समावेश होता. त्यांच्या डोक्याला इजा झाली होती.

उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते गोरेगाव पश्चिमेकडे राहत होते. बाजीप्रभू ढोल-ताशा प्रमुख सतीश धुमाळ यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्या निमित्तानेच ते ढोल-ताशा पथकात सहभागी झाले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात मृत पावलेल्या १३ पैकी १२ जणांचे पार्थिव रात्री ८ वाजतापासून टप्प्याटप्प्याने येऊ लागले. मृत पावलेले सर्वच आजुबाजूच्या वसाहतीत राहणारे होते. सर्वांवर आरेजवळील दहनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठी गर्दी झाली.

पार्थिव घरी आल्यापासून ते दहनभूमीत जाईपर्यंत गर्दीतून रडण्याचाच आवाज येत होता. नातेवाइकांचा आक्रोश, हातातोंडाशी आलेल्या तरुणांच्या जाण्याचा टाहो, हुंदक्यांनी दिंडोशी हादरली होती.



हेही वाचा

गोरेगाव : त्यांच्या मृत्यूने संतोष नगर परिसर हादरला, कुटुंबासाठी ठरला काळादिवस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा