Advertisement

मुंबई उपनगरातील बेरोजगारांनो ‘महास्वयंम’वर ‘ही’ माहिती नोंदवा, अन्यथा नोंदणी रद्द

या वेबपोर्टलवर मुंबई उपनगर जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या बेरोजगार तरूणांनी आधार व इतर अत्यावश्यक माहिती नोंदवण्याचं आवाहन कौशल्य विकास विभागाकडून करण्यात आलं आहे.

मुंबई उपनगरातील बेरोजगारांनो ‘महास्वयंम’वर ‘ही’ माहिती नोंदवा, अन्यथा नोंदणी रद्द
SHARES

लॉकडाऊनमुळे निर्माण होत असलेल्या बेरोजगारीवर मात करुन तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागामार्फत ‘महास्वयंम’ (http://rojgar.mahaswayam.gov.in) नावाचं वेबपोर्टल तयार करण्यात आलं आहे. या वेबपोर्टलवर मुंबई उपनगर जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या बेरोजगार तरूणांनी आधार व इतर अत्यावश्यक माहिती नोंदवण्याचं आवाहन कौशल्य विकास विभागाकडून करण्यात आलं आहे.  

अन्यथा नोंदणी रद्द

राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छुक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मुंबई उपनगर जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या आधार क्रमांकाची नोंद केलेली नाही. तरी अशा उमेदवारांना आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे, अन्यथा १५ ऑगस्टनंतर त्यांची नोंदणी रद्द होईल, असं सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर कार्यालयामार्फत कळविण्यात आलं आहे.

हेही वाचा - गुड न्यूज! ‘महास्वयंम’मार्फत रिक्त पदांची भरती सुरू

उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जॉब सिकर ऑप्शनमध्ये नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून आधार क्रमांक तथा नोंदणी अद्यावत करावी, असं आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर यांनी केलं आहे.

समन्वयाचं काम

उद्योग आणि त्यांना हवं असलेलं कुशल मनुष्यबळ यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं महत्वाचं काम या वेबपोर्टलमार्फत होत आहे. वेबपोर्टलवर कुशल उमेदवार हे आपली शैक्षणिक माहिती, अनुभव, कौशल्ये यांच्या आधारे नोंदणी करतात. त्यामुळे उद्योगांना हवं असलेलं कुशल मनुष्यबळ त्यांच्या गरजेनुसार या वेबपोर्टलवर सहज उपलब्ध होतं. यासाठी उद्योग आणि बेरोजगार तरुण यांची वेबपोर्टलवर अधिकाधिक नोंदणी करुन दोघांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रयत्न करीत आहे.

नोंदणी केलेले व प्रोफाईल अद्ययावत न केलेले तसंच एका जिल्‍ह्यातून दुसऱ्या जिल्‍ह्यात स्‍थलांतरित झालेल्‍या उमेदवारांना रोजगाराच्‍या संधीची माहिती होण्‍यासाठी त्‍यांना त्‍यांचे प्रोफाईल अद्ययावत करण्‍याबाबत वर्तमानपत्राच्‍या माध्‍यमातून तसंच वेबपोर्टलद्वारे जून २०२० पासून एसएमएस पाठविण्‍यात येत आहेत.

हेही वाचा - मराठी तरूणांना मिळणार रोजगार, मनसेच्या वेबसाईटचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा