Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

मराठी तरूणांना मिळणार रोजगार, मनसेच्या वेबसाईटचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मराठी तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या http://mnsrojgar.com वेबसाईटचं रविवारी उद्घाटन करण्यात आलं आहे.

मराठी तरूणांना मिळणार रोजगार, मनसेच्या वेबसाईटचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
Image Source: MNS' Manoj Gharat's Twitter handle
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मराठी तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या http://mnsrojgar.com वेबसाईटचं रविवारी उद्घाटन करण्यात आलं आहे. (Maharashtra Navnirman Sena (MNS) Raj Thackeray on Sunday launched a website - www.mnsrojgar.com - with an aim to provide employment to youth in the state during the time of coronavirus crisis.) या वेबसाईटच्या माध्यमातून लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील तरूणांना मदत केली जाणार आहे. सोबत उद्योग-व्यवसाय करण्यास इच्छुक तरूणांना मदतही केली जाणार आहे.

 मनसे आमदार राजू पाटील आणि मनसे नगरसेवक मनोज घरत यांच्या संकल्पनेतून ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. तर या उपक्रमाला मनसे नेते अमित ठाकरे यांचं सहकार्य लाभलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एमएनएस रोजगार या वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या उपक्रमाचं राज ठाकरे यांनी कौतुक करत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- मी ‘राजनिष्ठ’, राज ठाकरेंच्या वाढदिवसाला नांदगावकरांची भावनिक पोस्ट

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. देशाच आणि राज्याचंही अर्थचक्र बिघडलं. यामुळे महाराष्ट्रातील तरूणांचा रोजगार धोक्यात आला आहे. तर काही ठिकाणी नवीन संधीही उपलब्ध होत आहे. या संधी मराठी तरूणांना मिळाव्यात यासाठी मनसेने पुढाकार घेत हे वेबसाईटचं व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून दिलं आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पण सोबतच स्वत:चा उद्योग-व्यवसाय करण्यास इच्छुक तरूणांनाही बळ दिलं जाणार आहे, असं आमदार राजू पाटील यांनी सांगितलं.

तर लाॅकडाऊनला घाबरून परप्रांतीय कामगार महाराष्ट्र सोडून आपापल्या गावी गेल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक एमआयडीसीमध्ये मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ज्यात कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. मराठी तरूणांनी या संधीचा फायदा घेतल्यास त्यांना नक्कीच रोजगार मिळेल. त्यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरूणांनी जॉब पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन मनसेचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी सांगितलं.

हेही वाचा- राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत पोहोचला कोरोना... पण,

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा