Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

आम्हाला आदेश द्यायला लावू नका, कडक लाॅकडाऊनवरून मुंबई हायकोर्टाची सरकारला सूचना

पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. अशा जिल्ह्यात गेल्या वर्षीप्रमाणे कडक लाॅकडाऊन लावण्याची गरज आहे. आमच्यावर असा आदेश देण्याची वेळ आणू नका, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

आम्हाला आदेश द्यायला लावू नका, कडक लाॅकडाऊनवरून मुंबई हायकोर्टाची सरकारला सूचना
SHARES

पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. अशा जिल्ह्यात गेल्या वर्षीप्रमाणे कडक लाॅकडाऊन लावण्याची गरज आहे. आमच्यावर असा आदेश देण्याची वेळ आणू नका, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. शिवाय जर मुंबई मॉडेलंच सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं असेल तर इतर महापालिकांनीही हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे, असा सल्ला दिला. राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेताना मुंबई उच्च न्यायालयाने ही सूचना केली.

पुण्यातील कोरोनाची स्थिती अजूनही गंभीर आहे. बुधवार ५ मे पर्यंत पुण्यात ४३६३४९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली असून त्यापैकी ३९७३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ७११८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. पुणे शहरात विविध ठिकाणांहून उपचारांसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर तुलनेत आरोग्य सुविधा मात्र मर्यादीत आहेत. 

अशा स्थितीत जर मुंबईत (mumbai) चांगल्या पायाभूत सुविधा असतील, तरीही व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे इ. यांसारख्या महापालिकांनी मुंबई महापालिकेकडून गोष्टी समाजावून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी महापालिका आयुक्त, अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला पाहिजे, व्यवस्थापनाचा अभ्यास करत समान कार्यक्रम आखला पाहिजे.

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकेचं कौतुक, भाजप मात्र विरोधाचीच ढोलकी बडवतंय- महापौर

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्यावाढ थांबलेली नाही, ज्या ज्या ठिकाणी संसर्ग फैलावत आहे, त्या ठिकाणी सरकारने कडक लाॅकडाऊन लावला पाहिजे. नाहीतर आम्हाला तशा सूचना द्याव्या लागतील. असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. 

दरम्यान, काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेच्या (bmc) कोविड काळातील कामाचं कौतुक होत असताना देखील भाजप मात्र या ना त्या प्रकारे विरोधाचीच ढोलकी बडवण्याचं काम करत आहे, अशा शब्दांत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर हल्ला चढवला. 

महापालिकेने रेमडेसिवीरचा तुटवडा पडलेला असतानाही कधी कुठल्या रुग्णाला चिठ्ठी लिहून दिली नाही की ते आणा म्हणून. प्रत्येक रुग्णालयाला तेवढा साठा देऊन ठेवला आणि रेमडेसिवीर वापराला मर्यादाही घातल्या. मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढवल्या, शहरातील गर्दीची ठिकाणं कमी केली. बेड मॅनजेमेंट केलं, वाॅर रुम तयार केले. तक्रारी आल्यावर सातत्याने पाहणी करत दुरूस्त्या केल्या, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

(apply strict lockdown in covid 19 affected districts in maharashtra says bombay high court )


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा