Advertisement

विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी

नगरविकास विभागाने गुरुवारी जारी केलेल्या शासकीय ठरावानुसार, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 31,793.47 कोटी रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी
SHARES

महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत आहे.

14-पदरी आणि प्रवेश-नियंत्रित वाहतूक मार्गिका असलेल्या महत्त्वाकांक्षी विरार (virar)-अलिबाग मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरच्या (एमएमटीसी) पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

नगरविकास विभागाने गुरुवारी जारी केलेल्या शासकीय ठरावानुसार, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 31,793.47 कोटी रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

126.06 किमी लांबीचा हा कॉरिडॉर जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए), आगामी नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना जोडणारा एक प्रमुख पायाभूत सुविधा दुवा म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, प्रस्तावित कॉरिडॉर वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेन आणि अलिबाग तालुक्यांमधील 104 गावांमधून जाईल. 

तसेच, तो एनएच-48 (मुंबई-अहमदाबाद महामार्ग), एनएच-848, एनएच-61, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि एनएच-66 (मुंबई-गोवा महामार्ग) यांसारख्या अनेक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांना जोडेल.



हेही वाचा

काळाचौकीतील अभ्युदय नगर पुनर्विकासाला गती

ऐरोली-काटई नाका कॉरिडॉरचा टप्पा-2 पूर्ण

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा