Advertisement

या बांधकामांसाठी १०००हुन अधिक झाडांची कत्तल करण्यात येणार

सद्यस्थितीत अनेक प्रकल्प हे मुंबईत सुरू असून, या प्रकल्पांच्या बांधकामासाठी १००० हुन अधिक झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या बांधकामांसाठी १०००हुन अधिक झाडांची कत्तल करण्यात येणार
SHARES

मुंबईतील अनेक पायाभूत प्रकल्पांसाठी नेहमीच झाडांची कत्तल करण्यात येते. सद्यस्थितीत अनेक प्रकल्प हे मुंबईत सुरू असून, या प्रकल्पांच्या बांधकामासाठी १००० हुन अधिक झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई शहर व उपनगरात सध्या सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या विविध कामांसाठी ५०४ झाडांची तर पूल, इमारत बांधकामे व इतर विकास कामांसाठी ४८० झाडांची अशी एकूण ९८४ झाडांची कत्तल करण्यास आणि मेट्रो रेल्वे कामाच्या अंतर्गत ९३३ झाडे आणि इतर विकास कामांच्या अंतर्गत २३४ अशी एकूण १ हजार १६७ झाडे मूळ जागेवरून हटवून ती पुनररोपित करण्याबाबतच्या १३ प्रस्तावांना वृक्षप्राधिकरण समितीकडून मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे.

या समितीचे अध्यक्ष पालिका आयुक्त इकबाल चहल व सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक आदींनी या प्रस्तवांना मंजुरी दिली आहे.त्यामुळे आता मेट्रो रेल्वेच्या झाडांच्या अडथळ्यांमुळे अडलेल्या कामांना गती मिळणार आहे. तर कापण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात झाडे लावून पर्यावरण राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मुंबईत सध्या मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, नदी, नाले, रस्ते रुंदीकरण, इमारत बांधकामे आदी विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. या कामांसाठी दरवर्षी मोठया प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येते.

मंगळवारी वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत अगोदरच पेंडिंग एक प्रस्ताव आणि विद्यमान बैठकीतील २१ असे एकूण २२ प्रस्ताव मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी प्रस्ताव क्रमांक ८ व १६ ते २१ हे प्रस्ताव राखून ठेवत उर्वरित प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

मेट्रो रेल्वे, इतर कामांसाठी झाडांची कत्तल

  • मेट्रो रेल्वे कामांसाठी ५०४ झाडांची कत्तल
  •  पुलांच्या कामांसाठी ५२ झाडांची कत्तल
  • इमारत बांधकामांसाठी २७७ झाडांची कत्तल
  • नवीन रेल्वे मार्गासाठी ३७ झाडांची कत्तल
  • ओव्हरहेड वायरसाठी ११४ झाडांची कत्तल
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा