Advertisement

ड्युटि दरम्यान मुंबई पोलिसांसाठी बॉलिवूड स्टार्सच्या व्हॅनेटि व्हॅन सज्ज

शहरातील २२ मुख्य ठिकाणी पोलिस दलाला, विशेषत: महिला पोलिसांना, सुसज्ज तंबू आणि व्हॅनिटी व्हॅन दान देण्याचं ठरवंलं आहे.

ड्युटि दरम्यान मुंबई पोलिसांसाठी बॉलिवूड स्टार्सच्या व्हॅनेटि व्हॅन सज्ज
SHARES

द प्रॉड्युसर गिल्ड ऑफ इंडियानं शहरातील २२ मुख्य ठिकाणी पोलिस दलाला, विशेषत: महिला पोलिसांना, सुसज्ज तंबू आणि व्हॅनिटी व्हॅन दान देण्याचं ठरवंलं आहे. COVID 19 या आजाराशी लढा देणाऱ्या पोलिसांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला ‘मिशन सुरक्षा’ असं नाव देण्यात आलं आहे.

“ड्युटीवरील महिला पोलिसांच्या सुरक्षेसाठी 'मिशन सुरक्षा' हा उपक्रम सुरू करण्यात आम्हाला आनंद होत आहे. सिनेस्टार्सद्वारे वापरल्या जाणार्‍या पूर्ण सुसज्ज तंबू आणि व्हॅनिटी व्हॅनला ब्रेकटाइमसाठी विश्रांतीगृह म्हणून वापरता येऊ शकतं. आम्ही २२ प्रमुख ठिकाणी या व्हॅनिटी व्हॅन पुरवल्या आहेत," असं या समितीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान मुंबई पोलिस आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहेत. कोरोनाचा धोका असतानाही ते लढा देत आहेत. त्यांच्या कृतज्ञतेबद्दल बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. बॉलिवुड स्टार्सनी सोशल मीडियावर यासाठी उपक्रम देखील सुरू केला होता. यात अक्षय कुमार, कार्तिक आर्यन यांच्यासोबतच अनेक कलाकारांचा समावेश होता.

कोरोनाव्हायरसमुळे देशव्यापी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी निर्माते गिल्ड ऑफ इंडियानं पुढाकार घेतला होता. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित दैनंदिन वेतन मिळवणाऱ्या कामगारांसाठी एक मदत निधी उभारण्यात मदत केली होती.

इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर काउन्सिल आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज यांच्यासमवेत निर्माते गिल्ड ऑफ इंडिया यांनी एकत्र येत दैनंदिन वेतन मिळवणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यात ठराविक अमाऊंट जमा केली.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा