सहाय्यक आयुक्त संजोग कबरेंचा सत्कार

 CST
सहाय्यक आयुक्त संजोग कबरेंचा सत्कार

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत यशस्वी तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणारे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे हे या महिन्याचे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. महापालिका मुख्यालयात आयोजित महापालिका अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन कबरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी, संजय देशमुख, आय.ए. कुंदन आदी अतिरिक्त आयुक्त आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

महापालिकेच्या स्तरावर विविध प्रशासकीय कामांची पूर्तता योग्यप्रकारे आणि वेळेत करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग पुनर्रचनेसारखे आव्हानात्मक काम, विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय, निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्धता आणि प्रशिक्षण, तसेच मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी याबाबत प्रशासकीय स्तरावर सुयोग्य समन्वय आणि एकंदर निवडणूक प्रक्रियेचे सक्षम व्यवस्थापन कबरे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना मार्च २०१७ चे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Loading Comments