Advertisement

शिवाजी पार्कमध्ये भरला आठवडी बाजार


SHARES

मुंबईकरांनाही शेतातील ताजी भाजी रास्त दरात खरेदी करता यावेत यासाठी ठिकठिकाणी आठवडी बाजार भरवले जात आहेत. त्याप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्क येथे शनिवारी आठवडी बाजार भरला होता. शिवाजी पार्क जिमखान्याच्या प्रयत्नाने हा आठवडी बाजार भरवण्यात आला होता. या वेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

शहरात अनेक ठिकाणी भरवण्यात आलेल्या आठवडी बाजाराच्या तुलनेत दादरकरांनी या आठवडी बाजाराला भरभरून प्रतिसाद दिल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. या आठवडी बाजारात अभिनेता अतुल परचुरे, मिलिंद सोमण यांनी देखील खरेदी केली.

या वेळी अनेक ग्राहकांनी हा आठवडी बाजार आठवड्यातून दोन वेळा भरवला जावा अशी मागणी केली. 'मुंबई लाईव्ह' या आठवडी बाजाराचे माध्यम प्रायोजक आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा