Advertisement

एटीएसकडून पाच बांगलादेशींना अटक


एटीएसकडून पाच बांगलादेशींना अटक
SHARES

भारतात घुसखोर रोहिंग्याचं सावट असताना आता बांगलादेशी घुसखोरांचीही वाढ होत आहे. कारण नालासोपारा येथील आचोळा गावात ओळख लपवून राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. या पाचही जणांवर तुळींज पोलिस ठाण्यात भारतीय पासपोर्ट कायद्यांतर्गत आणि विदेशी नागरिक अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.


पाचही जण पोलिसांच्या ताब्यात

आचोळा गावातील हरीओम प्लाझा बिल्डिंगसमोर काही जण कामाच्या शोधात येतात आणि एकत्र निघून जातात. त्याची भाषाही वेगळीच असायची. त्यांच्याकडे खोदून चौकशी केल्यानंतर ते बांगलादेशातील असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर याबाबतची माहिती गुप्त बातमीदारांनी एटीएस नियंत्रण कक्षाला दिली.
एटीएस नियंत्रण कक्षाने पालघर एटीएसचे युनिट पाटवून या पाचही जणांना ताब्यात घेतलं. 


गुन्ह्यांची कबुली

आजीजू शेख(२८), सलीम मुल्ला (२५), मोहम्मद मन्सूर खान (२६), अलामीन मुल्ला (२४), शेफाली मुल्ला (४५) अशी या आरोपींची नावे आहेत. या पाचही जणांकडे भारतीय असल्याची ओळख दाखवणारे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत. या सर्वांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून ते पश्चिम बंगालमार्गे भारतात आल्याचं सांगत आहेत. एटीएस अधिक चौकशी करत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा