Advertisement

लक्ष द्या! मुंब्य्रातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

गुरुवार, 09 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहिल.

लक्ष द्या! मुंब्य्रातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद
SHARES

मुंब्रा रेल्वे फास्ट ट्रॅकवरील पुलाच्या बाजूने असलेल्या 350 मीटरच्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 12 तासांचा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार, 09 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दुरुस्ती कालावधीत रेतीबंदर, दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, मुंब्रा देवी, जीवनबाग, ठाकूरपाडा, आनंद कोळीवाडा, सम्राट नगर, संजय नगर, गावदेवी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

या दुरुस्तीच्या कामामुळे पुढील दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, नागरिकांनी नोंद घेऊन ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



हेही वाचा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा