Advertisement

विलेपार्ले येथील नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य; दुर्गंधीने स्थानिक हैराण

मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथे असलेल्या नाल्यात दुर्गंधी निर्माण झाली आहे. विलेपार्ले पश्चिम येथील सरदार वल्लभाई पटेल पार्क परिसरात हा नाला आहे.

विलेपार्ले येथील नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य; दुर्गंधीने स्थानिक हैराण
SHARES

मुंबईतील (mumbai) विलेपार्ले पश्चिम येथे असलेल्या नाल्यात दुर्गंधी निर्माण झाली आहे. विलेपार्ले पश्चिम येथील सरदार वल्लभाई पटेल पार्क परिसरात हा नाला आहे. या नाल्यात कचरा साचला असून, दुर्गंधी निर्माण झाली आहे. या नालाच्या शेजारी  मोठ्या प्रमाणात नागरिवस्ती असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

या नाल्यात साचलेल्या कचऱ्यामुळं निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळं नागरिकांना साथीच्या आजारांची भीती सतावत आहे. त्यामुळं या नाल्याच्या शेजारी असलेल्या चंदन सोसायटीमधील रहिवाशांनी महापालिकेकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.


पत्रव्यवहार व संबंधित कचऱ्याचे फोटो महापालिकेला दिले असून रितसर तक्रार दाखल केली आहे. या साचलेल्या कचऱ्याची विलेवाट लावून लवकरात लवकर परिसरातील दुर्गंधी नष्ट करावी यासाठी ट्वीटरवरूनही महापालिकेला कळविण्यात आलं. मात्र अद्याप महापालिका याकडं दुर्लक्ष करत असल्याची माहिती चंदन सोसायटीमधील रहिवाशी आशिष शाहा यांनी दिली.

दरम्यान, या नाल्याच्या शेजारीच महापालिकेचे उद्यान आहे. या उद्यानाच योग्य ती काळजी घेतली जाते, मात्र नाल्याची नाही असंही आशिष शाहा यांनी सांगितलं. त्यामुळं लवकरात लवकर या नाल्यातील कचऱ्याच्या समस्येवर महापालिकेनं तोडगा काढावा, अशी मागणी येथील स्थानिकांनी करत आहेत.

ward : mumbai

area : vile parle

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा